10,999 रुपयांना मिळतोय नवीन Samsung फोन, मिळेल 6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा

10,999 रुपयांना मिळतोय नवीन Samsung फोन, मिळेल 6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F13 ची पहिली विक्री आज

फोन फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध

ऑफरसह हा फोन 10,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध

साऊथ कोरियाची कंपनी सॅमसंगने गेल्या आठवड्यात आपला स्मार्टफोन Samsung Galaxy F13 लाँच केला आहे. या फोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. आज Galaxy F13 ची पहिली विक्री होणार आहे. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, फोन सॅमसंगच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा : 14 दिवस चालणारा OnePlus बँड झाला 900 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

किंमत आणि ऑफर

हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या बेस मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे, तर 128GB स्टोरेज मॉडेल 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर अंतर्गत, ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना 1,000 रुपयांची त्वरित सूट देखील दिली जाईल. यामुळे हा फोन 10,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल.

samsung galaxy f13

Samsung Galaxy F13 चे फीचर्स 

 Galaxy F13 मध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले स्लिम बेझल आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे. फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसरसह 4 GB RAM आणि 128 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. फोन वॉटरफॉल ब्लू, सनराईज कॉपर आणि नाईटस्की ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे, ज्यामध्ये 5-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल सेल्फी शूटर आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात ऑटो डेटा स्विचिंग, अडॅप्टिव्ह पॉवर सेव्हिंग आणि एआय पॉवर मॅनेजमेंट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo