14 दिवस चालणारा OnePlus बँड झाला 900 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

14 दिवस चालणारा OnePlus बँड झाला 900 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत
HIGHLIGHTS

OnePlus बँड झाला 900 रुपयांनी स्वस्त

वनप्लस बँडची नवी किंमत एकूण 1,599 रुपये

बँडमधील बॅटरी सिंगल चार्जवर तब्बल 14 दिवसांपर्यंत टिकेल

OnePlus ने आपला पहिला फिटनेस ट्रॅकर OnePlus Band गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात लाँच केला होता. या स्वस्त फिटनेस ट्रॅकरची किंमत आता 900 रुपयांनी घसरली आहे. फिटनेस बँडमध्ये AMOLED डिस्प्ले आहे आणि ते रक्तातील ऑक्सिजनचे निरीक्षण देखील करू शकते.

हे सुद्धा वाचा : Nothing Phone 1: लाँच होण्यापूर्वीच किंमत लीक, तीन व्हेरिएंटमध्ये येईल स्मार्टफोन

OnePlus बँडची नवीन किंमत

चीनी स्मार्टफोन निर्मात्याने वनप्लस बँड 2,499 रुपयांना लाँच केला होता. किमतीत कपातीनंतर, ग्राहक वनप्लस बँड 1,599 रुपयांना खरेदी करू शकतात. नवीन किंमत OnePlus.in आणि Amazon India या दोन्ही वेबसाइटवर दिसते. ग्राहक OnePlus बँड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. कंपनी सिटीबँक कार्डवर 10% झटपट सूट देखील देत आहे. येथून खरेदी करा… 

OnePlus  बँडचे फीचर्स 

वनप्लस बँड 126×249 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.1-इंच AMOLED डिस्प्लेसह येतो. टचस्क्रीन डिस्प्ले ऍडजस्टेबल ब्राइटनेस फिचरसह येतो. फिटनेस ट्रॅकर हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरसह सुसज्ज आहे. हे उपकरण तुमच्या ऍक्टिव्हिटीजना ट्रॅक करतो. 

वनप्लस बँड 13 वेगवेगळे एक्सरसाइज मोड ऑफर करतो, ज्यात आउटडोअर रन, इनडोअर रन, फॅट बर्न रन, आउटडोअर वॉक, आउटडोअर सायकलिंग, इनडोअर सायकलिंग, एलीप्टिकल ट्रेनर, रोइंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटन, पूल स्विमिंग, योग आणि फ्री ट्रेनिंग यांचा समावेश आहे. हे वेअरेबल IP68 रेटिंगसह येते, जे डिव्हाइसला पाणी प्रतिरोधक बनवते.

वनप्लस बँड ब्लूटूथ वर्जन 5.0 ला सपोर्ट करतो. तसेच, Android आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसह कार्य करतो. फिटनेस बँड 110mAh बॅटरीसह येतो आणि एका चार्जवर बॅटरी 14 दिवसांपर्यंत टिकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo