Samsung Galaxy S25
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने जानेवारी महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज Samsung Galaxy S25 सादर केली होती. लाँचच्या काही महिन्यांनंतर या सीरिजच्या फोनवर मोठ्या सवलती देण्यात येत आहेत. सध्या हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर प्रचंड डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही सुद्धा प्रीमियम फोनच्या शोधात असाल तर, Samsung Galaxy S25 5G खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स, एकापेक्षा एक पर्याय
Samsung Galaxy S25 5G फोनचा 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट अमेझॉनवरून 74,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या या फोनवर काही उत्तम डिल्स देखील उपलब्ध आहेत. फोनवरील डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन HDFC बँक कार्डद्वारे खरेदी केला तर तुम्हाला 7000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा QHD+ डायनॅमिक AMOLED 2X स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2340x 1080 पिक्सेल आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, फोन Android 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB रॅम आहे, तसेच 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. यासोबतच, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 29 तासांपर्यंत वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.