Samsung Galaxy S24 5G: Samsung ने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात Samsung Galaxy S24 5G सिरीज लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत येणारे महागडे फोन्स खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट उत्तम असण्याची आवश्यकता आहे. मात्र, Amazon वर तुम्हाला चांगली सवलत मिळत आहे, त्यामुळे तुम्ही हा फोन नेहमीपेक्षा 10,000 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घेऊयात Samsung Galaxy S24 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Samsung Galaxy S24 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. मात्र, सध्या Amazon वर हा फोन 5,000 रुपयांच्या सूटसह 74,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास फोनवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासह तुम्ही हा फोन आता केवळ 69,999 रुपयांना खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
Samsung Galaxy S24
Samsung Galaxy S24 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंग, हा फोन Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Samsung Galaxy S24 5G फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो.
Samsung Galaxy S24 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, या फोनमध्ये 10MP सेकंडरी आणि 12MP तिसरा कॅमेरा देखील आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile