Best Offer! Samsung Galaxy S23 Ultra वर हजारो रुपयांच्या Discount, डील मिस करू नका

Updated on 22-Apr-2025
HIGHLIGHTS

सध्या Samsung Galaxy S23 Ultra वर हजारो रुपयांची बचत करता येईल.

Samsung Galaxy S23 Ultra सध्या Amazon वर 25,019 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23 Ultra मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण सध्या Samsung Galaxy S23 Ultra वर हजारो रुपयांची बचत करता येईल. खरं तर, Samsung ने अलिकडेच आपली S25 सिरीज लाँच केल्यानंतर जुने मॉडेल्स प्रचंड सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy S23 Ultra हा एक लोकप्रिय फोन आहे. S23 अल्ट्रा दोन वर्षांपूर्वी लाँच झाला असला तरी, तो अजूनही एखाद्या फ्लॅगशिप डिव्हाइसपेक्षा कमी नाही. या फोनमध्ये तुम्हाला अनेक AI फीचर्स देखील मिळणार आहेत. जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 Ultra वरील डील-

Also Read: Vivo T4 5G Launched: 7300mAh बॅटरीसह येणारा पहिला स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

Samsung Galaxy S23 Ultra सध्या Amazon वर 25,019 रुपयांच्या सवलतीसह 84,980 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,490 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. या कार्डच्या मदतीने तुम्हाला ते 4,120 रुपयांच्या मासिक हप्त्यांवर देखील खरेदी करता येईल.

जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन या फोनसोबत एक्सचेंज केला तर तुम्हाला त्यावर 27,350 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकेल. मात्र, जास्तीत जास्त एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान मॉडेलची स्थिती व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Samsung Galaxy S23 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1440 x 3088 पिक्सेल इतके आहे. त्याबरोबरच, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 (4nm) प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23 Ultra मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला 200 +10 +10 + 12MP कॅमेरा सेन्सर मिळणार आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, तुम्हाला त्यात 12MP कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी एका चार्जवर वेब सर्फिंग सारख्या बेसिक कार्यांसह दोन दिवस चालण्याची क्षमता ठेवते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :