साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलीकडेच आपला बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M16 5G फोन लाँच केला. दरम्यान, सध्या या फोनवर प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon भारी सवलती ऑफर करत आहे. हा फोन तुम्हाला बँक ऑफर्स, EMI सारख्या सवलतींसह मिळणार आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M16 5G फोनची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Latest Gaming Phone Under 20000: स्वस्तात खरेदी करा नवा गेमिंग स्मार्टफोन, iQOO, Realme फोन्स उपलब्ध
Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोन कंपनीने 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केला आहे. त्याबरोबरच, या फोनचा टॉप मॉडेल 14,499 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 630 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. हा फोन एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, Amazon Pay द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला कॅशबॅक देखील मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा नवीन सॅमसंग फोन अँड्रॉइड 15 वर आधारित वन यूआय 7.0 वर कार्य करतो. स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, मागील बाजूस 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 2MP डेप्थ सेन्सर आहे. तसेच आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, यात 13MP सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, या सॅमसंग फोनमध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय एसी, ब्लूटूथ 5.3, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.
टीप: महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही Amazon प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला वर नमूद केलेले प्रोडक्ट्स फास्टेस्ट डिलिव्हरीमध्ये मिळतील. एवढेच नाही तर Amazon Prime मेंबरशिपचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यासह तुम्हाला ऑफर्स आणि इतर सुविधा देखील मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.