त्वरा करा ! 50MP कॅमेरा असलेल्या Redmi फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, YouTube Premium देखील मोफत

Updated on 04-Jul-2022
HIGHLIGHTS

Redmi Note 11 बंपर डिस्काउंटसह खरेदी करा

मिळतेय 1,500 रुपयांपर्यंत झटपट सूट

तसेच, दोन महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मेंबरशिप फ्री

जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच्या घडीला Redmi Note 11 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. या फोनचा 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट कंपनीच्या वेबसाइटवर 15,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. यावर कंपनी 1,500 रुपयांपर्यंत झटपट सूट देत आहे. या सवलतीसाठी, तुम्हाला SBI कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. याशिवाय, तुम्ही ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. विशेष बाब म्हणजे या फोनच्या खरेदीवर कंपनी दोन महिन्यांसाठी YouTube Premium ची फ्री मेंबरशिप देखील देत आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Samsungने लाँच केला Smart Upgrade Program , फक्त 70% पैसे देऊन घरी आणा नवीन टीव्ही

Redmi Note 11 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनी या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच फुल एचडी + AMOLED डॉट डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये असलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. कंपनीचा स्मार्टफोन 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Adreno 610 GPU सह Snapdragon 680 मिळेल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
 
AI फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची  बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर Redmi चा हा फोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :