प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आपली Realme P सिरीज फोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनवर कंपनीने आज एक नवीन ऑफर जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने ‘P-सीरीज कार्निवल’ सेल सुरु केला आहे. या कार्निवलमध्ये ब्रँडचा रंग बदलणारा मोबाइल Realme P3 Pro 5G चार हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. या 5G फोन मॉडेलची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल. चला तर मग जाणून घेऊयात Realme P3 Pro 5G वरील भारी ऑफर्स-
Also Read: Motorola Edge 60 Stylus ची पहिली सेल भारतात सुरु! मिळतो S-Pen सारखा स्टायलस, पहा ऑफर्स
रिअलमी पी-सीरीज कार्निव्हल हा कंपनीने आयोजित केलेला मर्यादित कालावधीचा कार्यक्रम आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कार्निवल सेल 22 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत सुरू राहील. या सेलचे लाभ कंपनीच्या वेबसाइट आणि Flipkart वर मिळतील. कंपनी Realme P3 Pro 5G वर 4000 रुपयांची बँक ऑफर देत आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फेडरल बँक, बीओबी, DBS, IDFC, HDFC, SBI, ICICI, Axis, Axis CBC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 4000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, Realme च्या या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यावर 3000 रुपयांपर्यंत लाभ मिळेल.
Realme P3 Pro 5G फोनमध्ये 6.83-इंच लांबीचा 1.5k डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येतो. या मोबाईलमध्ये वेट टच तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे ओल्या हातांनीही हा फोन तुम्हाला वापरता येतो. उत्तम परफॉर्मन्स, सुरळीत कामकाजासाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
फोटोग्राफीसाठी, Realme P3 Pro ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP चा मुख्य लेन्स आहे, जो सोनी IMX896 सेन्सर आहे. यासोबतच, मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2MP चा सेकंडरी लेन्स देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Realme P3 Pro 5G फोन 16MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6000mAh मोठी आणि पॉवरफुल बॅटरी आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.