Realme GT 6T
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने देखील व्हॅलेंटाईन डे निमित्त Valentines Day Sale लाईव्ह केली आहे. ही सेल 6 फेब्रुवारीपासून सुरु झालेली असून 14 फेब्रुवारीपर्यंत लाईव्ह असेल. या सेलदरम्यान Realme ने आपल्या महागड्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर केल्या आहेत. कंपनीचा Realme GT 6T 5G स्मार्टफोन या सेलदरम्यान प्रचंड डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा फोन कंपनीने मिड बजेटमध्ये सादर केला होता. जाणून घेऊयात ऑफर्स-
Also Read: Realme Valentine Day Sale: 50MP मेन कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी Discount, पहा यादी
Realme च्या अधिकृत साईटवर Realme GT 6 5G स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन सध्या व्हॅलेंटाईन डे सेलदरम्यान 7,500 रुपयांच्या सवलतीसह केवळ 23,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 500 रुपयांचा डिस्काउंट कुपन मिळत आहे. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Realme च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Realme GT 6 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2780x 1264 आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, Realme GT 6 5G स्मार्टफोन ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेटसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित realme UI 5.0 वर कार्य करतो. Realme GT 6 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये येतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येतो. हँडसेटचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा सोनी IMX355 कॅमेरा आणि 50MP चा Samsung S5KJN5 कॅमेरा आहे. त्याच्या मागील बाजूस फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या समोर 32MP चा Sony IMX615 कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी फोनमध्ये पोर्ट्रेट, मल्टी सीन, नाईट मोड सारखे कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट आहे. हँडसेट 120W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो.