32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Realme 14 Pro+ 5G वर मोठी सूट, मिळेल 4000 रुपयांचा Discount

Updated on 18-Feb-2025
HIGHLIGHTS

Realme ने आपला मिड-बजेट स्मार्टफोन अलीकडेच Realme 14 Pro + 5G भारतात लाँच केला.

सध्या Realme 14 Pro + 5G स्मार्टफोनवर Flipkart भारी डील ऑफर करत आहे.

Realme 14 Pro + 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme आपल्या स्मार्टफोन्समधील अनोख्या फीचर्ससह ग्राहकांना नेहमीच खुश करते. नुकतेच Realme ने आपला मिड-बजेट स्मार्टफोन Realme 14 Pro + 5G भारतात लाँच केला होता. सध्या या स्मार्टफोनवर Flipkart भारी डील ऑफर करत आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. जसे की, जम्बो बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरासारखे फीचर्स मिळतात. यामध्ये तुम्हाला आकर्षक आणि युनिक पर्ल डिझाईन मिळेल. जाणून घेऊयात Realme 14 Pro + 5G वरील ऑफर्स-

Also Read: ऑफर चुकवू नका! लोकप्रिय Vivo V40e 5G वर धमाकेदार Discount, मिळवा तब्बल 9000 रुपयांची सूट

Realme 14 Pro+ 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme 14 Pro+ 5G फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सध्या Flipkart वर 34,999 रुपये आहे. मात्र, सध्या हा फोन मोठ्या बँक कार्ड सवलतींसह खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 4000 रुपयांची फ्लॅट सूट दिली जात आहे. हा फोन EMI ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. तसेच, यात एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Realme 14 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 14 Pro+ 5G फोनमध्ये 6.83 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 5G प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, हे अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमसह कार्य करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB RAM आणि 12GB RAM चे पर्याय आहेत. तर, स्टोरेजमध्ये 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेजचे पर्याय उपलब्ध असतील.

फोटोग्राफीसाठी, Realme 14 Pro + 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 8MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घकाळ बॅकअप देईल, असे कंपनीने सांगितले आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :