Realme 13 Pro
जर तुम्ही देखील नवा जबरदस्त Realme फोन खरेदी करू इच्छिता तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. मागील वर्षी Realme 13 Pro फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन तुम्ही 20,000 रुपयांअंतर्गत खरेदी करू शकता. प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट Amazon वर हा फोन बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme 13 Pro ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: बहुप्रतीक्षित Poco C71 फोन भारतात अखेर लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी, फीचर्सही जबरदस्त
Realme 13 Pro चा 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये 26,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांची इन्स्टंट सूट मिळू शकते.
त्याबरोबरच, प्रभावी किंमत 18,749 रुपये होईल. त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 17,400 रुपयांची सूट मिळू शकते. हा फोन मोनेट गोल्ड, मोनेट पर्पल आणि एमराल्ड ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Realme 13 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल आणि 120Hz इतका रिफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 50MP चा प्राथमिक कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. तसेच, यात 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, वाय-फाय, USB टाइप-C पोर्ट आणि ब्लूटूथ 5.2 सपोर्टचा समावेश आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP65 रेटिंग आहे.’
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.