Realme Valentines Day Sale
Realme Valentines Day Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त Realme Valentines Day Sale सुरु केली आहे. यामध्ये Realme चे प्रोडक्ट्स मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जर तुम्हालाही या सेलचा लाभ घ्यायचा असेल तर, आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. कंपनीचे Realme 13 Pro+ 5G फोन विशेष सवलतीसह उपलब्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 2024 च्या अखेरीस Realme ने त्यांच्या प्रसिद्ध स्मार्टफोन Realme 13 Pro+ 5G ची किंमत कमी करून सर्व व्हेरिएंटच्या किंमती 2000 हजार रुपयांनी कमी केल्या होत्या. आता, त्याच्या चाहत्यांना भेट म्हणून, या फोनवर 7000 रुपयांपर्यंतची मोठी सूट दिली जात आहे. जाऊन घेऊयात ऑफर्स-
Also Read: व्हॅलेंटाईन्स डे सेलमध्ये Realme GT 6T वर तब्बल 7,500 रुपयांची सूट, 50MP कॅमेरासह मिळतात भारी फीचर्स
व्हॅलेन्टाईन्स डे सेलमध्ये Realme 13 Pro+ च्या 12GB+256GB व्हेरिएंटवर 7000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचे 8GB+ 256GB आणि 12GB+ 512GB व्हेरिएंट 6,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या वेबसाईटवर Realme 13 Pro+ 5G ची किंमत कुपन प्राईस म्हणून 24,999 रुपये इतकी आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI चा लाभ देखील घेता येईल. ही ऑफर केवळ मर्यादित काळापर्यंत उपलब्ध आहे.
Realme 13 Pro+ 5G फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. ही पंच-होल स्टाइल स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 चिपसेटवर 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर आधारित लाँच करण्यात आला.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी हा फोन HyperImage+ तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये मागील बाजूस 50MP LYT701 मुख्य सेन्सर आहे, जो 50MP LYT600 पेरिस्कोप लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह एकत्रितपणे कार्य करतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5,200mAh क्षमतेच्या शक्तिशाली बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी, या स्मार्टफोनमध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध आहे.