Oppo Reno 13 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने Oppo Reno 13 5G फोन अलीकडेच भारतात लाँच केला होता. हा फोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5600mAh बॅटरी सारखे पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्हाला Oppo Reno 13 5G फोन खरेदी करायचा असेल, यावर सध्या उत्तम ऑफर्स मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Oppo Reno 13 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Important! लेटेस्ट Vivo V50e का खरेदी करावा? ‘या’ 7 पॉईंट्ससह जाणून घ्या सविस्तर माहिती
OPPO Reno13 5G ची किंमत 37,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, या फोनचा टॉप व्हेरिएंट 39,999 रुपयांना येतो. हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आत्ताच अधिकृत वेबसाइटवरून OPPO Reno13 5G खरेदी केल्यास फेडरल बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सूट दिली जात आहे.
OPPO Reno13 5G फोनमध्ये 6.59-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 2760x 1253 इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Mediatek Dimensity 8350 प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी, OPPO Reno13 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5600mAh बॅटरी दिली गेली आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. चार्जिंगसाठी, फोनमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे.