OPPO Find X8 pro
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Oppo Find X8 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने महागड्या श्रेणीमध्ये लाँच केला आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्हाला नक्कीच आपले बजेट प्लॅन करण्याची आवशक्यता आहे. पण सध्या Oppo चा हा फ्लॅगशिप फोन Find X8 Pro फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. जाणून घेऊयात Oppo Find X8 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
OPPO Find X8 Pro 5G फोनची किंमत 99,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान हा फोन मोठ्या सवलतीत खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis बँक त्यांच्या क्रेडिट कार्डधारकांना Find X8 Pro खरेदी करण्यावर तब्बल 9,999 ची सूट देत आहे. तसेच, या स्मार्टफोनवर 4,897 रुपये प्रति महिना EMI दिला जात आहे. याव्यतिरिक्त, हँडसेटवर 66,600 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Oppo Find X8 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास 7 बसवण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, कंपनीने आपल्या अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर प्रदान केला आहे. हा फोन Android 15 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. या हँडसेटमध्ये ॲम्बियंट लाइट, प्रॉक्सिमिटी आणि ई-कंपाससारखे सेन्सर्स उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, OPPO Find X8 Pro 5G मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिला 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, दुसरा 50MP वाइड अँगल आणि तिसरा 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. तसेच, यात व्हिडिओ, पोर्ट्रेट, नाईट, पॅनोरमा आणि उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी टाइम-लॅप्स सारखे स्पेक्स आहेत. आकर्षक सेल्फीसाठी हा फोन 32MP फ्रंट कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5910mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 80W SUPERVOOC जलद चार्जिंग आणि 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.