OPPO F27 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने काही काळापूर्वी Oppo F27 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. हा फोन सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर मोठ्या प्रमाणात सवलतींसह उपलब्ध आहे. 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह अनेक पॉवरफुल फीचर्स या फोनमध्ये उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oppo F27 5G ची किंमत आणि सर्व ऑफर्स-
Also Read: लेटेस्ट महागड्या OnePlus फोनवर तब्बल 5000 रुपयांचा Discount, ‘या’ सेलदरम्यान हजारो रुपयांची बचत
Oppo F27 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते. त्याबरोबरच, या फोनचा टॉप व्हेरिएंट 22,999 रुपयांना येतो. हा स्मार्टफोन सध्या Flipkart वरून खरेदीवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास उपलब्ध आहे. हा फोन एक्सचेंज ऑफरसह येतो. तुम्हाला हा फोन नो कॉस्ट- EMI सह देखील खरेदी करता येईल. हा फोन एमराल्ड ग्रीन आणि अंबर ऑरेंजचा कलर ऑप्शन्ससह येतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Oppo F27 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Octa Core MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित कलरओएस 14.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.
Oppo F27 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP चा पोर्ट्रेट कॅमेरा फ्लॅशसह उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ सारखी वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये AI इरेजर 2.0, AI स्मार्ट इमेज मॅटिंग 2.0, आणि AI स्टुडिओ आहेत.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo F27 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. फोन चार्ज करण्यासाठी USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.