OnePlus Nord 4 5G
फ्लॅगशिप किलर OnePlus ने अलीकडेच भारतीय बाजरात OnePlus Nord 4 5G स्मार्टफोन लाँच केला. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, सध्या Amazon ने एक उत्तम ऑफर सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ई-कॉमर्स साइटवर तब्बल 7,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. थेट सवलतीसह या फोनवर बँक ऑफर्सचे उत्तम फायदे देखील उपलब्ध आहे. जाणून घेऊयात, OnePlus Nord 4 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Price Drop! आकर्षक Samsung Galaxy Ring च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 रुपयांची घट
OnePlus Nord 4 5G चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वर 29,998 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध आहे. लक्षात घ्या की, हा फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये 32,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. या फोनवरील उपलब्ध बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4000 रुपयांची त्वरित सूट मिळेल, त्यानंतर या फोनची प्रभावी किंमत 25,998 रुपये इतकी होईल. अशाप्रकारे तुम्हाला तब्बल 7,000 रुपयांची सवलत मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord 4 मध्ये 6.74-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1240x 2772 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला सुधारित कामगिरी, अपग्रेडेड AI कॅपिबिलिटीज प्रदान करते, ज्यामुळे ते मागणी असलेल्या गेमिंगसाठी अधिक योग्य बनते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास, कॅमेरा सेटअपसाठी या फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि मागील बाजूस 8MP चा सोनी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500Ah बॅटरी देण्यात आली आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.