OnePlus कडून आकर्षक ऑफर! 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 5G स्मार्टफोन

OnePlus कडून आकर्षक ऑफर! 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 5G स्मार्टफोन
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 2 Lite 5G 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा.

12,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी.

ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर सेलमध्ये मिळेल 2 हजार रुपयांची सूट

अतिशय स्वस्त दरात OnePlus 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कंपनीच्या कम्युनिटी सेलमध्ये तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. फोनचा 6 GB रॅम + 128 GB रॅम व्हेरिएंट ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर 19,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. फोन खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट  डिस्काउंटदेखील मिळेल. या डिस्काउंटसह फोनची किंमत 17,999 रुपये असेल. विशेष म्हणजे तुम्हाला 12,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह OnePlus Nord CE 2 Lite 5G खरेदी करता येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाले, तर हा फोन 19,999 रुपयांऐवजी केवळ 7,999 मध्ये तुमचा होईल. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : VI चा अप्रतिम प्रीपेड प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये सर्व काही, 365 दिवस रहा टेन्शन फ्री

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये कंपनी 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59-इंच लांबीचा डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून, OnePlus Nord CE 2 Lite मध्ये Snapdragon 695 5G देण्यात आला आहे.

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह तीन कॅमेरे पाहायला मिळतील. यामध्ये, 64-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

या व्यतिरिक्त, हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे. तसेच OnePlusचा हा फोन 5000mAh बॅटरीने समर्थित आहे, जो 33W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करतो. OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 12 वर आधारित नवीनतम OxygenOS वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये WiFi आणि ब्लूटूथ 5.2 सह सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo