VI चा अप्रतिम प्रीपेड प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये सर्व काही, 365 दिवस रहा टेन्शन फ्री

VI चा अप्रतिम प्रीपेड प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये सर्व काही, 365 दिवस रहा टेन्शन फ्री
HIGHLIGHTS

365 दिवसांची वैधता उपलब्ध असलेला VIचा रिचार्ज प्लॅन.

या रिचार्ज प्लॅनची किंमत एकूण 3,099 रुपये.

डिझनी + हॉटस्टार, वीकेंड डेटा रोलओव्हरसह अनेक आकर्षक फायदे उपलब्ध

टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea वापरकर्त्यांना मोठ्या फायद्यांसह अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. VIचा असा एक प्लॅन देखील आहे, जो तुम्हाला 365 दिवसांसाठी सर्वोत्तम बेनिफिटसह मोबाइल रिचार्ज करण्याच्या टेन्शनपासून फ्री ठेवते. आम्ही Vodafone-Idea च्या 3,099 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. कंपनीचा हा प्लॅन तुम्हाला थोडा महाग वाटेल, पण त्यात मिळणारे फायदेही आकर्षक आहेत. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देत आहे. यासोबतच डिझनी + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये एका वर्षासाठी उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅनबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : 6000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरासह Poco C40 लाँच, किंमत फक्त 11,688 रुपये

Vodafone-Idea चा 3,099 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. यामध्ये कंपनी दररोज 2 GB डेटा देते, म्हणजेच यात तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतील. व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट आहेत.

याव्यतिरिक्त, या प्लॅनच्या ग्राहकांना कंपनी एका वर्षासाठी डिझनी+हॉटस्टार मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट बेनिफिट देखील दिले जात आहे, जेणेकरुन आवडते शो किंवा चित्रपट पाहताना डेटाचे कोणतेही टेंशन नाही. यादरम्यान, वापरकर्ते दैनंदिन डेटाचा कोटा खर्च न करता रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकतात.

याशिवाय, कंपनी या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील देत ​​आहे. VI च्या या प्लॅनमध्ये डेटा डिलाईटचा फायदाही दिला जात आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रत्येक महिन्याला 2 GB पर्यंत मोफत डेटा मिळेल. 121249 डायल करून किंवा ViApp द्वारे या बेनिफिटचे ऍक्सेस मिळवता येईल.  कंपनीच्या या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo