oneplus 12 5g
OnePlus 12 5G Discount: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने अलीकडेच आपली नवीन नंबर प्रिमिअम स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 सिरीज लाँच केली आहे. त्यानंतर, पूर्वीचे मॉडेल्स कंपनी सवलतींसह उपलब्ध करून देत आहे. होय, सध्या OnePlus 12 5G वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. इ-कॉमर्स साईट Amazon वर आकर्षक ऑफर्स आणि EMI सारखे पर्याय मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus 12 5G ची किंमत आणि डिस्काउंट-
Also Read: AC Deals Under 30000: आता परवडणाऱ्या किमतीत 1 टनचे स्प्लिट एसी खरेदी करा! पहा बेस्ट डील्स
OnePlus 12 चा 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट शॉपिंग वेबसाइट सध्या Amazon वर 51,998 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेकडून 6000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आहे. याशिवाय, हँडसेटवर 2,521 रुपयांचा EMI आणि 24,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. हा फोन फ्लोई एमराल्ड, ग्लेशियल व्हाइट आणि सिल्की ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर केला गेला आहे. येथून खरेदी करा!
OnePlus 12 मध्ये 6.82-इंच लांबीचा ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 बसवण्यात आला आहे. या फोनचा स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिप उपलब्ध आहे. यात 512GB इंटरनल स्टोरेज आहे. सुरळीत कामकाजासाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, अँबियंट लाईट, प्रॉक्सिमिटी आणि इन्फ्रारेड सारखे महत्त्वाचे सेन्सर मिळतील.
फोटोग्राफीसाठी, या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP वाइड अँगल, 64MP पेरिस्कोप सेन्सर आणि 48MP अल्ट्रा वाइड लेन्स आहे. याद्वारे 8K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये फेस अनलॉक, नाईटस्केप सेल्फी एचडीआर आणि स्क्रीन फ्लॅश सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये मोठी 5400mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स मिळत आहे.