OnePlus 11 5G वर थेट 7,000 रुपयांचा Discount, महागडे TWS देखील मिळतील Free! Tech News 

OnePlus 11 5G वर थेट 7,000 रुपयांचा Discount, महागडे TWS देखील मिळतील Free! Tech News 
HIGHLIGHTS

Amazon GIF Saleमध्ये OnePlus 11 5G आतापर्यन्तच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध

सेलदरम्यान स्मार्टफोनवर 4,000 रुपयांच्या डिस्काउंट कूपन मिळेल.

स्मार्टफोन खरेदी केल्यास OnePlus Buds Z2 मिळतील अगदी मोफत

OnePlus 11 5G स्मार्टफोन हा फोन यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला होता. हा फोन सध्या सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. तुम्ही तो Amazon Great Indian Festival Sale मधून आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या विक्रीवर थेट 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, मोफत TWS देखील ऑफर केले जात आहेत. चला तर मग ऑफरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

OnePlus 11 5G वरील ऑफर

Oneplus 11 5G
Oneplus 115G

OnePlus 11 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 56,999 रुपये आहे. Amazon Great Indian Festival Sale मध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह खरेदी करता येणार आहे. तुम्ही 4,000 रुपयांच्या डिस्काउंट कूपनसह OnePlus 11 5G स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. तसेच, 3000 रुपयांची बँक डिस्काउंट ऑफर देखील दिली जात आहे. यानंतर बेस व्हेरिएंटची किंमत केवळ 50 हजार रुपये इतकी होईल. हा स्मार्टफोन इतक्या स्वस्त किमतीत पहिल्यांदा ऑफर करण्यात येत आहे. येथून खरेदी करा

OnePlus Buds Z2 देखील मिळतील मोफत

जर तुम्ही हा फोन सेलदरम्यान खरेदी केला तर तुम्हाला एक खास गिफ्ट देखील मिळणार आहे. होय, तुम्हाला OnePlus Buds Z2 अगदी मोफत मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus Buds Z2 ची किंमत 4,999 रुपये इतकी आहे.

OnePlus 11 5G

OnePlus 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्यासह 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. फोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेट सह येतो. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX581 सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सरसह 32MP चा टेलीफोटो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येईल. हा फोन थर्ड जनरेशन हॅसलब्लॅड कॅमेरा आणि डॉल्बी व्हिजन HDR आणि डॉल्बी ATMOS सपोर्टसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo