ही अप्रतिम ऑफर प्रथमच ! SAMSUNGच्या महागड्या फोनसाठी ‘Buy Now, Pay Later’ ऑप्शन लाँच

Updated on 29-Jul-2022
HIGHLIGHTS

SAMSUNG फोन हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

फ्लॅगशिप आणि फोल्डेबल स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 'Buy Now, Pay Later' पर्याय जाहीर

2,999 रुपयांमध्ये Watch4 आणि Buds2 मिळवा

कमी बजेटमुळे तुम्ही SAMSUNG कडून प्रीमियम किंवा फोल्डेबल फोन खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही डाउन पेमेंट न करता महागडा सॅमसंग फोन खरेदी करू शकता. खरं तर, सॅमसंगने प्रथमच त्याच्या फ्लॅगशिप आणि फोल्डेबल स्मार्टफोनवर 'Buy Now, Pay Later' पर्याय जाहीर केला आहे, जो ग्राहकांना प्रीमियम सॅमसंग फोन खरेदी करण्यासाठी एक सोपा पर्याय देतो. ही ऑफर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे आणि भारतभरातील रिटेल आउटलेटवर याचा लाभ घेता येईल.

हे सुद्धा वाचा : महागड्या रिचार्जचा त्रास संपला! सुमारे 100 रुपयांमध्ये संपूर्ण महिनाभर सुरु राहील सिम, जाणून घ्या रिचार्ज प्लॅन्स

एकूण रकमेच्या 60% 18 हप्त्यांमध्ये भरा

'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' या पर्यायासह, ग्राहकांना एकूण रकमेच्या 60% रक्कम फक्त 18 समान मासिक हप्त्यांमध्ये, उर्वरित 40% रक्कम 19 व्या हप्त्यात एकरकमी पेमेंट म्हणून भरावी लागेल. या ऑफरसाठी केवळ 1.5 लाख रुपयांची किमान क्रेडिट मर्यादा असलेले ग्राहकच पात्र आहेत. इतकेच नाही तर, ऑफरमध्ये Galaxy S22 सिरीज, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर झिरो डाऊन पेमेंट आणि किमान प्रक्रिया शुल्क फक्त 1% आहे.

2,999 रुपयांमध्ये Watch4 आणि Buds2 मिळवा

ICICI Buy Now pay later ऑफर व्यतिरिक्त, Galaxy S22 Ultra 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch4 फक्त 2,999 रुपयांमध्ये आणि Galaxy S22+ 5G किंवा Galaxy S22 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds 2 फक्त 2,999 रुपयांमध्ये मिळू शकेल. 

स्मार्टफोन Galaxy Note सिरीजमधील उत्तम कामगिरी आणि आयकॉनिक S Pen सपोर्टसह देखील येतो. त्याचा प्रो-ग्रेड कॅमेरा आणि कामगिरीने भारतातील प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. ही सिरीज  डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि धूळ आणि पाणी प्रतिरोधक (IP68) रेटिंगसह येते.

याव्यतिरिक्त, Galaxy Z Fold3 5G आणि Galaxy Flip3 5G प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन देखील त्यांच्या खास लुकसाठी लोकप्रिय आहेत. ज्यांना फंक्शनसह स्टाईल हवी आहे, त्यांच्यासाठी Galaxy Z Flip 3 5G त्याच्या स्लीक, कॉम्पॅक्ट आणि पॉकेटेबल डिझाइनमुळे उत्तम पर्याय आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :