Motorola Edge 50 Pro
Motorola लवकरच आपला आगामी Motorola Edge 60 Pro फोन लाँच करणार आहे. मात्र, आगामी फोनच्या लाँचच्या तोंडावरच लाँच विद्यमान Motorola Edge 50 Pro वर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. सध्या Amazon वर हा फोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. अमेझॉनच्या किमतीत कपात आणि बँक ऑफर्समुळे ग्राहक मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोनवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 50 Pro ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: 50MP कॅमेरासह Itel A95 5G फोन भारतात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
Motorola Edge 50 Pro सध्या 30,400 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक वनकार्ड आणि HDFC कार्ड सारख्या निवडक उपकरणांचा वापर करून अतिरिक्त 1500 रुपयांची बचत करू शकता. तसेच, एक्सचेंज ऑफर्सनुसार या फोनवर 22,800 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. युजर्स 1474 रुपये प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट EMI पर्यायांचा देखील पर्याय निवडू शकतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Motorola Edge 50 Pro मध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5K pOLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 SoC प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Motorola Edge 50 Pro फोनमध्ये युजर्सना 50MP प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो सेन्सर मिळेल. एवढेच नाही तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 50MP चा कॅमेरा देण्यात आला. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 125W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.