motorola g85 5g
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने काही काळापूर्वी Moto G85 5G फोन भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने 20000 रुपयांअंतर्गत लाँच केला आहे. जर तुम्ही टिकाऊ फॉर्म फॅक्टर, चांगली कामगिरी आणि कॅमेरा देणारा स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही नक्कीच Motorola G85 5G फोनचा विचार करू शकता. या किमतीत फोनमध्ये अनेक पॉवरफूल फीचर्स मिळतात. जसे की, यात मोठी बॅटरी आणि 32MP फ्रंट इ. फीचर्स मिळतील. सध्या या फोनवर हजारो रुपयांची बचत होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola G85 5G वरील डील-
Moto G85 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सध्या Flipkart वर 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, खरेदीदारांना निवडक बँक कार्डद्वारे 1000 रुपयांची बँक सूट मिळू शकते. या ऑफरमुळे या फोनची किंमत 16,999 रुपयांपर्यंत कमी होते. जर तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करत असाल, तर तुम्हाला डिव्हाइसच्या सर्वोत्तम शक्य किंमतीसह 1,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळू शकतो. लक्षात घ्या की, या फोनवर 16,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.
एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन EMI द्वारे खरेदी करू शकता. तुम्ही नो-कॉस्ट EMI पर्याय निवडू शकता, जो दरमहा 3000 रुपयांपासून सुरू होतो. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तर IDFC बँक कार्डद्वारे डिव्हाइसवर तुमचे 1500 रुपये वाचतील. त्याबरोबरच, ग्राहकांना 799 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट प्रोटेक्ट आणि 349 रुपयांमध्ये विस्तारित वॉरंटी मिळू शकते.
Moto G85 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल-एचडी+ 3D कर्व्हड पीओएलईडी पॅनल देण्यात आला आहे. फोनवर प्रोटेक्शनसाठी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन उपलब्ध आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आह. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी शूटर आणि 8MP अल्ट्रावाइड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या डिव्हाइसमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्जिंगसह येईल. यासह तुमचा डिवाइस केवळ काही मूलभूत कार्ये केल्यास दोन दिवसांपर्यंत सुरु राहू शकतो.