Vivo V50
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo V50 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. दरम्यान, या लेटेस्ट फोनची विक्री देखील भारतात सुरु झालेली आह. हा स्मार्टफोन कंपनीने जरा महागड्या बजेट श्रेणीत सादर केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि 50MP फ्रंट कॅमेरा सारखे पॉवरफुल फीचर्स मिळतात. नुकतेच लाँच झालेल्या या फोनवर तुम्हाला भारी सूट मिळत आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, कारण तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. जाणून घेऊयात Vivo V50 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Price Drop! आकर्षक Moto G85 5G फोनवर मिळतोय प्रचंड Discount, 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध
Vivo V50 5G फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांना Flipkart उपलब्ध आहे. मात्र, सध्या हा फोन तब्बल 6000 रुपयांच्या सवलतीसह 36,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. Vivo V50 5G च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3,700 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 26,850 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V50 5G फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा क्वाड कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर आहे. तसेच, फोन अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम आहे, 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत.
फोटोग्राफीसाठी, Vivo V50 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबत 50MP चा सेकेंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग दिले आहे.