VIVO V50 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच भारतात आपला Vivo V50 5G फोन लाँच केला. लाँच होताच या फोनच्या कॅमेराची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. विवोने या सिरीजचा विस्तार करत, Vivo V50 Pro आणि Vivo V50e फोन देखील लाँच केला आहे. हे स्मार्टफोन कंपनीने मिड बजेटमध्ये सादर केले आहेत. सध्या Vivo V50 5G फोनवर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येत आहेत. फोनमध्ये तुम्हाला 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V50 5G फोनची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Upcoming Phone: आगामी CMF Phone 2 Pro चे पॉवरफुल फीचर्स लाँचपूर्वीच उघड! किती असेल किंमत?
Vivo V50 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 42,999 रुपये आहे. तथापि, सध्या तुम्ही ते स्वस्तात खरेदी करू शकाल. डिस्काउंटबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही या फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून आत्ताच 36,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
एवढेच नाही तर, जर तुम्ही Amazon प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला वर नमूद केलेले प्रोडक्ट्स फास्टेस्ट डिलिव्हरीमध्ये मिळतील. एवढेच नाही तर Amazon Prime मेंबरशिपचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
Vivo V50 5G फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यासोबतच, डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2392x 1080 पिक्सेल इतके आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 15 आधारित FOS15 वर काम करतो. याशिवाय, फोनमध्ये 5G + 5G ड्युअल सिम ड्युअल सपोर्ट देखील आहे. तसेच, पाण्याच्या संरक्षणासाठी, या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo V50 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये, तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा सेकंड कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळणार आहे, ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगसह येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिन्स्क आहेत.