50MP फ्रंट कॅमेरासह Vivo V40 Pro 5G वर तब्बल 6000 रुपयांची सूट, अशी डील पुन्हा मिळणार नाही
Vivo चा Vivo V40 Pro 5G स्मार्टफोन आकर्षक डिझाईन पॉवरफुल फीचर्ससह येतो.
Vivo V40 Pro 5G फोन 50 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येतो.
सध्या Vivo V40 Pro 5G स्मार्टफोनवर अप्रतिम सवलती मिळत आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo सध्या बेस्ट स्मार्टफोन्स देण्यामध्ये शीर्षस्थानी आली आहे. कंपनीचे अधिकतर स्मार्टफोन्स लाँच होताच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतात. Vivo चा Vivo V40 Pro 5G स्मार्टफोन देखील आकर्षक डिझाईन पॉवरफुल फीचर्ससह येतो. हा फोन कंपनीने जरा महागड्या बजेटमध्ये सादर केला आहे. पण सध्या Flipkart या फोनवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स देत आहे. पहा ऑफर्स-
Survey
Vivo V40 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स
लेटेस्ट Vivo V40 Pro 5G च्या सेल ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 49,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 3000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे. तसेच, जुन्या किंवा विद्यमान फोनच्या एक्सचेंजवर तुम्हाला 31,200 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याव्यतिररिक्त, तुम्हाला एक्सचेंजवर 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफ तर नक्कीच मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Vivo V40 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीनतम Vivo V40 Pro 5G फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800×1260 पिक्सेल आणि रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Mediatek Dimensity 9200 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB स्टोरेज मॉडेल आहे. तसेच, या फोनमध्ये 256GB आणि 512GB स्टोरेज आहे. या फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी, नवीनतम Vivo V40 Pro 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP सेकंडरी आणि 50MP ZEISS टेलिफोटो पोर्ट्रेट सेन्सर मिळेल. तसेच, तुम्हाला आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5500mAh आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला गेला आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile