Samsung Galaxy S25
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S25 5G सिरीज लाँच केली आहे. लाँचच्या अवघ्या काही दिवसांतच या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. होय, कंपनीने सिरीजच्या Samsung Galaxy S25 5G नव्या प्रीमियम फोनवर थेट 10,000 रुपयांची सवलत ऑफर केली आहे. ही ऑफर तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: Confirm! आगामी स्लिम Vivo V50 फोनमध्ये मिळेल 6000mAh जंबो बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स कन्फर्म
Samsung च्या नव्या प्रिमियम फोन Samsung Galaxy S25 5G फोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 80,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S25 5G फोन तुम्हाला HDFC बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांची वेगळी डिस्काउंट ऑफर मिळेल. त्यानंतर, तुम्ही हा फोन 70,999 रुपयांना खरेदी करता येईल.
एवढेच नाही तर, या फोनवर नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. सहज खरेदी करण्यासाठी EMI 3,927 रुपयांपासून सुरु होतो. तसेच, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज ऑफरसाठी उपलब्ध असेल तर, या फोनवर तब्बल 33,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, चांगल्या एक्सचेंज व्हॅल्यूसाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनची स्थिती सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP चा टेलिफोटो सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 4900mAh आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.