प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात आपले नवे P सिरीज स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. त्यापैकी एक Realme P3 Pro 5G फोन सध्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या फोनचा बॅक पॅनल अंधारात चमकणाऱ्या तंत्रज्ञानासह येतो. हा फोन मिड बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. सध्या हा फोन 2000 रुपये सवलतीसह मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme P3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: मस्तच! दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात Vivo T4x 5G लाँच, स्वस्तात कॅमेरासह मिळेल रिंग लाईट
Realme P3 Pro 5G फोनचा 8GB RAM+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. फोनच्या 8GB RAM+ 256GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची सवलत दिली जात आहे.
लक्षात घ्या की, HDFC, SBI, ICICI, Axis, PNB, BOB, DBS, IDFC, J&K, HSBC, Federal bank आणि One Card द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास लागू होईल. हा Realme 5G मोबाईल नेब्युला ग्लो, गॅलेक्सी पर्पल आणि सॅटर्न ब्राउन रंगांमध्ये खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Realme च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Realme P3 Pro हा या सेगमेंटचा पहिला ‘ग्लो-इन-द-डार्क’ डिझाइन फोन आहे, जो अंधारातही चमकतो. हा रंग बदलणारा 5G फोन आहे, ज्यामध्ये रंग बदलण्याची तंत्रज्ञान आहे. Realme P3 Pro 5G फोनमध्ये 6.83-इंच लांबीचा 1.5k डिस्प्ले आहे. ही क्वाड कर्व स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. लक्षात घ्या की, हा फोन वेट टच तंत्रज्ञानासह येतो, ज्यामुळे तो ओल्या हातांनी देखील वापरता येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 7S Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, Realme P3 Pro ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP चा मुख्य लेन्स आहे, जो सोनी IMX896 सेन्सर आहे. यासोबतच, मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2MP चा सेकंडरी लेन्स देखील उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हा फोन 16MP फ्रंट कॅमेरा आहे, जो सोनी IMX480 सेन्सर आहे.
पॉवर बॅकअपसाठी, 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 80W ची फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या Realme 5G फोनमध्ये मिलिटरी ग्रेड टिकाऊ डिझाइन आणि IP66 + IP68 + IP69 प्रमाणपत्र आहे जे मोबाइलला पाणी आणि धूळपासून संरक्षण करण्यास मदत करते.