iQOO 12 5G Offers: फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध स्मार्टफोनवर तब्बल मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount

Updated on 29-Jan-2025
HIGHLIGHTS

iQOO ने iQOO 12 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात सवलत ऑफर केली आहे.

iQOO 12 5G स्मार्टफोन Amazon India वर मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध

तुम्हाला iQOO 12 5G फोनवर तब्बल 5000 रुपयांची सवलत मिळेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO 12 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात सवलत ऑफर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा स्मार्टफोन 2023 वर्षी लाँच केला होता. लाँच होताच या स्मार्टफोनच्या कॅमेराला मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात आली. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन आकर्षक डिझाईन आणि पॉवरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतो. iQOO 12 5G स्मार्टफोन Amazon India वर मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन-

Also Read: आगामी Nothing Phone (3a) चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, मोठ्या बॅटरीसह मिळतील Powerful फीचर्स

iQOO 12 5G ची किंमत आणि ऑफर्स

iQOO 12 5G फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 59,999 रुपये आहे. मात्र, सध्या सेलदरम्यान तुम्ही हा फोन 45,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. डिस्काउंट ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, या फोनवर 3000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर तब्बल 5000 रुपयांची सवलत मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

iQOO 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 12 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, iQOO 12 5G फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO 12 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो, ज्यामध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग आहे.

iQOO 12 5G Price discount

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO 12 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, यासह 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, तिसरा कॅमेरा 64MP चा आहे, ज्यामध्ये 100x झूम सपोर्ट मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :