50MP सेल्फी कॅमेरासह Honor च्या 5G फोनवर भारी Discount! 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीची संधी

Updated on 20-Jan-2025
HIGHLIGHTS

Honor 200 5G वर सध्या भारी डिस्काउंट उपलब्ध आहे.

Honor 200 5G फोनवर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळणार आहे.

Honor 200 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

तुम्हाला देखील नवा आणि सर्वोत्तम सेल्फी कॅमेरासह येणारा फोन हवा असेल तर, Honor 200 5G वर सध्या भारी डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या कमी दरात खरेदी करता येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा 50MP फ्रंट कॅमेरासह येणारा मोबाइल फोन जुलै 2024 मध्ये मिड बजेटमध्ये सादर करण्यात आला होता. मात्र, आता Amazon वर हा फोन मोठ्या सवलतीसह मिळत आहे. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व ऑफर्स-

Also Read: Vodafone Idea New Plans: भरपूर डेटा आणि Unlimited बेनिफिट्ससह नवा प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत

Honor 200 5G

Honor 200 5G ची किंमत आणि ऑफर्स

Honor 200 5G 8GB 256GB मॉडेल भारतात 34,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आले. हा व्हेरिएंट 11,001 रुपयांपेक्षा स्वस्तात Amazon India वर विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या हा 5G फोन Amazon वर 23,998 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Honor 200 5G फोनवर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Honor 200 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Honor 200 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 1.5K स्क्रीन आहे. हा OLED पॅनेलवर तयार केलेला क्वाड-कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. Honor 200 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या टॉप मॉडेलमध्ये 12GB रॅमसह 512GB स्टोरेज मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी Honor 200 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP Sony IMX906 मुख्य सेन्सर मिळणार आहे. यासोबतच, 12MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 50MP 2.5x टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. हा फोन आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Honor 200 5G स्मार्टफोन 5200mAh बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :