Google Pixel 8
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google चा Google Pixel 8 कंपनीचा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सपैकी एक आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोन्समध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान सादर केले आहेत. सध्या Google Pixel 8 स्मार्टफोनवर प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Flipkart वर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. हा फोन कंपनीचा प्रिमियम स्मार्टफोन आहे, जो महागड्या श्रेणीमध्ये लाँच केला गेला. चला तर मग जास्त वेळ न घालवता Google Pixel 8 ची किंमत आणि ऑफर्स जाणून घेऊयात-
Also Read: आगामी Infinix Smart 9 HD ची भारतीय लाँच डेट जाहीर! Powerful फीचर्ससह लवकरच होणार दाखल
Google च्या Google Pixel 8 फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 75,999 रुपये इतकी निश्चित केली होती. मात्र, सध्या हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, सध्या हा फोन 26,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 49,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तसेच, HDFC बँकेच्या कार्डद्वारे फोनवर 3000 रुपयांची सूट मिळत आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google ने Google Pixel 8 मध्ये 6.2 इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यया डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, गूगल पिक्सेल 8 फोन Tensor G3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. तसेच, फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 फोनमध्ये 8GB रॅम+ 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी रियर कॅमेरा, 12MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहेत. फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 4575mAh बॅटरी देण्यात आली आहे. लक्षात घ्या की, फोन सिंगल चार्जसह तब्बल 72 तास काम करतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.