Vivo V40 Pro
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने नुकतेच Vivo V50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर जुन्या Vivo फोन्सवर सर्वोत्तम ऑफर्स दिले जात आहेत. हे स्मार्टफोन्स कंपनीने मध्यम श्रेणीमध्ये लाँच केला आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सध्या Vivo V40 Pro फोनवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. या फोनवर बँक ऑफर्स, EMI इ. अनेक सुविधा मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V40 Pro वरील ऑफर्स-
Also Read: Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स!
Vivo V40 Pro 5G फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 60,999 रुपये आहे. मात्र, आता हा फोन 5000 रुपयांच्या सवलतीसह 55,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40 Pro 5G च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही बँक कार्डद्वारे फोन खरेदी केला तर तुम्हाला 3000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. यासह तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफर्स देखील मिळणार आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9200+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज करण्यात आला आहे. यासोबतच, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच OS 14 वर कार्य करतो. पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP68 रेटिंग देण्यात आले आहे. हा फोन 8GB RAM, 12GB RAM आणि 256GB आणि 512GB स्टोरेज मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या Vivo फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपमध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX921 आहे. यासोबतच, यात 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP चा तिसरा कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी मिळणार आहे, जी 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाच्या समर्थनासह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.