Vivo T3 Ultra 5G
सध्या शीर्षस्थानी असलेली प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची T सिरीज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. हा फोन कंपनीने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo T3 Ultra कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये म्हणजेच 30,000 रुपयांअंतर्गत लाँच केला आहे. हा फोन 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP मेन कॅमेरासह अनेक पॉवरफुल फीचर्ससह येतो. हा फोन Flipkart वर मोठ्या सवलतींसह ऑफर केला जात आहे.
Also Read: तारीख नोट करा! अखेर बहुचर्चित Vivo V50 फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म, पहा अपेक्षित किंमत
Vivo T3 Ultra फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 35,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्ड डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच, या फोनवर EMI ऑप्शन्स आणि एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन लूनर ग्रे आणि फ्रॉस्ट ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Vivo T3 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसह उत्तम परफॉर्मन्ससाठी, Vivo T3 Ultra फोनमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आहे. फोनमध्ये 5G+ 5G ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन 3 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहेत. हा फोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo T3 Ultra फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX921 OIS आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. विशेष म्हणजे फोनच्या मागील बाजूस स्मार्ट ऑरा लाईट रिंग देखील देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यासह तुम्हाला 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 रेटिंग देण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.