Oppo Reno 13 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अलीकडेच Oppo Reno 13 Pro 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. सध्या हा फोन सध्या डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन कंपनीने 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे. होय, हा फोन जरा महागड्या किंमत श्रेणीमध्ये येतो. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये विविध फोटोग्राफी मोडसह 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo Reno 13 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Finally! लेटेस्ट Vivo V50e फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स
OPPO Reno 13 Pro 5G सध्या क्रोमावर सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन क्रोमावर 49,999 रुपयांना उपलब्ध आहे. या किमतीत 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळतोय. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
त्याबरोबरच, या स्मार्टफोनवर दरमहा 2,354 रुपयांचा नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहे. याशिवाय, हँडसेटवर 40,000 रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. लक्षात घ्या की, हा फोन ग्रेफाइट ग्रे आणि मिस्ट लव्हेंडर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Oppo ने या स्मार्टफोनमध्ये 6.83 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, OPPO Reno 13 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 50MP वाइड अँगल, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो सेन्सर मिळतोय. एवढेच नाही तर, याद्वारे तुम्हाला 4K व्हिडिओ देखील रेकॉर्ड करता येतील. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. यात व्हिडिओ, फोटो, पोर्ट्रेट, नाईट, हाय-रेझोल्यूशन, टाइम-लॅप्स आणि ड्युअल व्ह्यू व्हिडिओ सारखे कॅमेरा स्पेसिफिकेशन आहेत.
याव्यतिरिक्त, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, OPPO Reno 13 Pro मध्ये 5800mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हे बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळाला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये फिंगरप्रिंट, प्रॉक्सिमिटी, अँबियंट लाईट, ई-कंपास आणि जायरोस्कोप सारखे सेन्सर्स देण्यात आले आहेत. एकंदरीत हा फोन तुमच्यासाठी अनेक सर्वोत्तम फीचर्स घेऊन येतो.