Vivo T3 Lite 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची T सिरीज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तुम्ही देखील बजेटमध्ये एखादा स्वस्त 5G स्मार्टफोन शोधात असाल तर, Vivo T3 Lite 5G सध्या मोठ्या सवलतींसह खरेदी करता येईल. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा स्मार्टफोन सध्या हजारो रुपयांच्या सवलतीसह मिळत आहे. हा फोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला होता. Vivo T3 Lite 5G मध्ये 50MP कॅमेरासह अनेक पॉवरफुल फीचर्स मिळतात. जाणून घेऊयात Vivo T3 Lite 5G वरील ऑफर्स आणि सर्व तपशील-
Vivo T3 Lite 5G फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 14,499 रुपयांना सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या फोनवर मोठी सवलत उपलब्ध आहे. तुम्ही सध्या हा फोन फ्लिपकार्टवरून 4000 रुपयांच्या सवलतीत 10,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर, बँक कार्डद्वारे या फोनवर 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध असेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Vivo T3 Lite 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.46 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1612x 720 पिक्सेल आहे, फोनचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Mediatek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 4GB RAM आणि 6GB RAM ला सपोर्ट करतो. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आले आहे.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T3 Lite 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळत आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच, फोनमध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध आहे, जी 1TB पर्यंत वाढवता येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.