प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची X सिरीज भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अलीकडेच कंपनीने Vivo V50 फोन लाँच भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. नवा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर जुने मॉडेल्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, नुकतेच कंपनीने आगामी स्मार्टफोन Vivo X200 फोनच्या लाँचबद्दल माहिती उघड केली आहे. दरम्यान, कंपनीने प्रिमिअम मॉडेल Vivo X100 स्मार्टफोनवर सध्या भारी सूट मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत आणि सर्व ऑफर्स-
Also Read: Vivo Camera Phones: फोटो काढताना येईल आणखी मज्जा! शानदार फोटोग्राफीसाठी Best आहेत ‘हे’ फोन्स
Vivo X100 चा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट क्रोमावर ग्राहकांसाठी 63,999 रुपयांना उपलब्ध आहे. या डिव्हाइसचा 16GB+ 512GB स्टोरेज व्हेरिएंट 69,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, येस आणि एचडीएफसी बँक Vivo X100 वर 4000 रुपयांची सूट देत आहे. हा स्मार्टफोन 3,295 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI सह उपलब्ध आहे. यासोबतच, डिव्हाइसवर एक्सचेंज डील देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी क्रोमा वेबसाईटला भेट द्या.
Vivo X100 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. या विवो स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, जलद काम करण्यासाठी कंपनीने Vivo X100 स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज प्रदान केले आहे. तसेच, हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो.
फोटोग्राफीसाठी, Vivo X100 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 64MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, त्यातील पहिले दोन लेन्स 50MP लेन्स आहेत. या फोनच्या मागील बाजूस फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे. त्यात अॅस्ट्रो, लँडस्केप यांचा समावेश आहे. & आर्किटेक्ट, प्रो, फूड, लाईव्ह फोटो आणि सिनेमॅटिक पोर्ट्रेट सारखे कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या विवो स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. त्याच्या बॅटरीला 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळाला आहे.