iQOO Z10 price in India
iQOO Z10 First Sale: सर्वात मोठ्या बॅटरीसह येणारा फोन IQOO Z10 भारतात अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज पहिल्यांदाच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा फोन कंपनीने मिड बजेटमध्ये लाँच केली आहे. हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरून खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात नवीनतम iQOO Z10 5G फोनची किंमत आणि त्यावर उपलब्ध सर्व ऑफर्स-
Also Read: OnePlus च्या लेटेस्ट प्फ्लॅगशिप फोनवर 5000 रुपयांचा Discount, 50MP चे तीन कॅमेरे उपलब्ध
iQOO Z10 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या तिन्ही व्हेरिएंटवर 2000 रुपयांची बँक ऑफर उपलब्ध असेल. त्यानुसार फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे. त्याबरोबरच, 8GB+ 256GB व्हेरिएंट 21,999 रुपयांना आणि 12GB+ 256GB व्हेरिएंट 23,999 रुपयांना खरेदी करता येईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि SBI बँका डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध शॉपिंग साइट Amazon वर ग्राहकांना इतर बँक क्रेडिट कार्डद्वारे EMI करण्यावर डील देत आहे. हा 5G फोन ग्लेशियर सिल्व्हर आणि स्टेलर ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
iQOO Z10 5G फोन 2392 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.77-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही पंच-होल स्टाइलची AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानासह येते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर यात उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, IQOO Z10 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा मुख्य OIS सेन्सर आहे जो LED फ्लॅशसह सुसज्ज आहे, जो 50MP च्या सेकंडरी लेन्ससह कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, IQOO Z10 हा भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन आहे, जो 7,300mAh बॅटरीला सपोर्ट करतो. चार्जिंगसाठी या 5G फोनमध्ये 90W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञान आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.