Apple iPhone 11 सध्या Flipkart वर अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. आयफोन 11 कंपनीने 2019 मध्ये सादर केला होता आणि हा आतापर्यंतचा सर्वाधिक विकला जाणारा iPhone आहे. डिव्हाइसमध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना HD डिस्प्ले आहे. फोन A13 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे.
जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु बजेट कमी असेल तर तुम्ही Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर फक्त 12,999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.
सध्या, Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 40,999 रुपयांना विकला जात आहे. बँक ऑफ बडोदा कार्डने पैसे भरताना ग्राहक 10% (रु. 1000 पर्यंत) झटपट सवलत मिळवू शकतात किंवा IDFC FIRST बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर रु. 5,000 पर्यंत बचत करू शकतात. अशा प्रकारे फोनची किंमत 39,999 रुपयांपर्यंत खाली येईल. याशिवाय, एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला 27,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला या सर्व ऑफर्स मिळाल्यास Apple iPhone 11 तुमच्याकडे 12,999 रुपयांचा असेल.
Apple ने सप्टेंबर 2019 मध्ये iPhone 11 सिरीज लाँच केली. स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच लांबीचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. Appleचा A15 बायोनिक चिपसेट स्मार्टफोनला पॉवर करतो. यात जलद चार्जिंग क्षमतेसह 18W ऍडॉप्टर देखील आहे.
हँडसेट ड्युअल कॅमेरा सेटअप ऑफर करतो, ज्यामध्ये f/2.4 आणि f/1.8 अपर्चरसह 12MP अल्ट्रा-वाइड आणि 12MP रुंद कॅमेरे समाविष्ट आहेत. समोर, स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 12MP कॅमेरा आहे, जो f/2.2 अपर्चरसह सुसज्ज आहे. शिवाय, फोनचा कॅमेरा 120-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू ऑफर करतो.