Best Smartphones Under 25000
Best Smartphones Under 25000: 2024 वर्ष संपायला आता फक्त्त काही दिवस उरले आहेत. या वर्षी सुप्रसिद्ध स्मार्टफोन्स कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत निरनिराळे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या वर्षी स्मार्टफोन्सच्या केवळ डिझाईनमध्येच नाही तर, फीचर्समध्ये देखील अधिक नाविन्यपूर्ण कामगिरी दिसली. Samsung, Realme पासून Redmi पर्यंत अनेक कंपन्यांनी प्रत्येक बजेटमध्ये स्मार्टफोन लाँच केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, या वर्षी 25000 रुपयांच्या अंतर्गत लाँच झालेल्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात यादी-
Also Read: Best 50MP Camera Smartphones under 7000: कमी किमतीत उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ स्मार्टफोन्स, पहा यादी
सर्वप्रथम आपण देशी स्मार्टफोन निर्माता Lava च्या नवीनतम स्मार्टफोन Lava Agni 3 बद्दल जाणून घेऊयात. हा स्मार्टफोन कंपनीने ऑक्टोबर महिन्यात लाँच केला होता. Lava Agni 3 स्मार्टफोन कंपनीने 19,999 रुपयांना सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने अनेक विशेषतांनी सज्ज केला आहे. खरं तर, हा एक सामान्य स्मार्टफोन आहे, परंतु फोनमध्ये तुम्हाला ड्युअल डिस्प्ले मिळणार आहे. Lava Agni 3 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, यात कॅमेरा मॉड्यूलच्या उजव्या बाजूला 1.7-इंच AMOLED सेकंडरी पॅनेल देखील आहे.
Motorola Edge 50 Fusion हा स्मार्टफोन Motorola ने मे महिन्यात लाँच केला होता. हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला होता. फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD 3D कर्व पोलइडी डिस्प्ले मिळतो. तसेच, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे.
Realme 13+ 5G स्मार्टफोनया यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लाँच करण्यात आला होता. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेराने मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus Nord CE4 स्मार्टफोन देखील अलीकडेच लाँच केला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. हा फोन 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5500mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा नवा स्मार्टफोन iQOO Z9s Pro फोन देखील अलीकडेच भारतात लाँच केला गेला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Z9s Pro स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.