Best Camera Phones Under 20000: अप्रतिम कॅमेरासह शीर्षस्थानी आहेत हे ‘5’ स्मार्टफोन्स, पहा यादी

Updated on 11-Apr-2025
HIGHLIGHTS

20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स

Realme ने Realme Narzo 80 Pro 5G फोन नुकताच भारतात लाँच केला.

या यादीत Oppo, Xiaomi, OnePlus, iQOO इ. कंपन्यांचे स्मार्टफोन्स समाविष्ट

Best Camera Phones Under 20000: जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि तुमचे बजेट 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, बाजारात आजकाल सर्व स्मार्टफोन्स ऍडव्हान्स कॅमेरा फीचर्ससह येतात. तुम्ही देखील स्मार्टफोन फोटोग्राफीचे शौकीन आहात, तर या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या बेस्ट 5 कॅमेरा स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. या यादीत Oppo, Xiaomi, OnePlus, iQOO इ. कंपन्यांचे स्मार्टफोन्स आहेत. पहा यादी-

Also Read: Realme Gaming Phones: जबरदस्त फोन्सवर मिळतायेत गोल्डन डील्स! मोठ्या डिस्काउंटसह खरेदीची संधी

Realme Narzo 80 Pro 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme Narzo 80 Pro 5G फोन नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. कॅमेराच्या बाबतीत कंपनीने हा फोन 50MP सोनी IMX882 मुख्य सेन्सरसह सादर केला आहे. त्याबरोबरच, यात तुम्हाला 2MP चा मोनोक्रोम सेन्सर दिला आहे. त्याबरोबरच, फोनच्या समोर 16MP सोनी IMX480 लेन्स देखील उपलब्ध आहे. एकंदरीत तुम्हाला त्यात एक चांगला कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन 19,999 रुपये सुरुवातीच्या किमतीत लाँच झाला आहे.

Oppo F25 Pro

Oppo F25 Pro फोन परवडणाऱ्या किमतीत एक उत्तम पर्याय आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MPचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. या फोन वॉर्म टोनसह येतो, ज्यामुळे फोटोज अधिक ड्रॅमॅटिक दिसतात. या फोनच्या पोर्ट्रेट मोडमध्ये स्किन टोन डिटेक्शन आहे. मात्र, महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये OIS चा सपोर्ट नाही. या कमतरतेमुळे डायनॅमिक शॉट्समध्ये थोडासा हलकेपणा येण्याची शक्यता आहे.

Redmi Note 13 Pro

Redmi Note 13 Pro फोन देखील 20,000 रुपयांच्या किंमत श्रेणीमध्ये चांगला पर्याय आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 200MP ISOCELL HP3 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा चांगले फोटोज कॅप्चर करत. त्याबरोबरच, फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉलिंग आणि व्लॉगिंगसाठी चांगला आहे. तसेच, या फोनमध्ये एडिटिंगसाठी अनेक AI फीचर्सचा सपोर्ट देखील आहे.

OnePlus Nord CE 4 Lite

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलरने OnePlus Nord CE 4 Lite फोन अलीकडेच लाँच केला आहे. या फोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, पोर्ट्रेटसाठी 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. या फोनमधील नाईट मोडमुळे फोटो चांगले येतात. विशेष म्हणजे या फोनचा फ्रंट कॅमेरा अचूक स्किन टोन आणि पोर्ट्रेट मोडमध्ये चांगल्या एज डिटेक्शनसह समाधानकारक सेल्फी कॅप्चर करतो. थोडक्यात OnePlus Nord CE 4 Lite स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी उत्तम मानला जातो.

Vivo T3

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo आता स्मार्टफोनमध्ये अप्रतिम कॅमेरा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच आपली Vivo V50 सिरीज सादर केली आहे. मात्र, 20,000 रुपयांच्या अंतर्गत Vivo T3 फोन कॅमेराच्या बाबतीत उत्तम आहे. या फोनमध्ये OIS असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा सेन्सर आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :