Best 50MP Camera Smartphones under 7000
Best 50MP Camera Smartphones under 7000: तुम्ही सुद्धा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात. पण तुमचे बजेट कमी आहे? तर अजिबात काळजी करू नका. कारण अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी सध्या बाजारात अगदी कमी किमतीत उत्तम स्मार्टफोन्स सादर केले आहेत. अगदी 6000 ते 7000 रुपयांच्या दरम्यान खरेदीसाठी अनेक स्मार्टफोन पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा, मजबूत बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात 7000 रुपयांअंतर्गत 50MP कॅमेरासह येणारे बेस्ट स्मार्टफोन्स-
Also Read: WhatsApp Update: आता लवकरच स्वतःच ट्रान्सलेट होतील मॅसेजेस, लवकरच येतोय महत्त्वाचे नवा फिचर!
POCO C61 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 5,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Poco च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, हा स्मार्टफोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने देखील सुसज्ज आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung चे अनेक बजेट स्मार्टफोन्स पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी, Samsung Galaxy M05 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरळीत कामकाजासाठी, हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco चा बजेट स्मार्टफोन POCO C65 ची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. POCO C65 हा एक बजेट स्मार्टफोन आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोठा 6.74-इंच लांबीचा डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे सज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल-लेन्स रियर कॅमेरा सिस्टम आहे, त्यासह 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीला देखील सपोर्ट करतो.