शेवटचा दिवस! Amazon ग्रेट समर सेलमध्ये फ्लिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, तब्बल 12000 रुपयांपर्यंत Discount। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेल 2024 संपायला अवघे काही तास उरले आहेत.

Motorola Razr 40 स्मार्टफोन Amazon सेल दरम्यान 44,999 रुपयांना सूचिबद्ध

TECNO Phantom V Flip 5G वर 12000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध

शेवटचा दिवस! Amazon ग्रेट समर सेलमध्ये फ्लिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, तब्बल 12000 रुपयांपर्यंत Discount। Tech News 

Amazon ग्रेट समर सेल 2024 संपायला अवघे काही तास उरले आहेत. ज्यांनी या सेलचा लाभ घेतला नाही त्यांनी त्वरा करा. या सेल दरम्यान बंपर डील आणि डिस्काउंट ऑफरसह विविध ब्रँडची प्रोडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आजकाल, बाजारात फ्लिप स्मार्टफोनची खूप क्रेझ आहे. परंतु हाय बजेटमुळे प्रत्येकजण ते खरेदी करू शकत नाही. मात्र, आता या सेलमध्ये तुम्ही पुढील महागडे फ्लिप फोन खूपच स्वस्त किंमतीत मिळवू शकता. बघा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Motorola razr 40

Motorola Razr 40 स्मार्टफोन Amazon सेल दरम्यान 44,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ही फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 2,182 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. या फोनमध्ये 6.9 इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि 1.5 इंच कव्हर डिस्प्ले आहे. याशिवाय हा फोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Moto Razr 40 at amazon great summer sale 2024

Motorola razr 40 Ultra

Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोन Amazon सेल दरम्यान 69,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ही फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 3,394 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

TECNO Phantom V Flip 5G

TECNO Phantom V Flip 5G स्मार्टफोन Amazon सेल दरम्यान 54,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ई-कॉमर्स कंपनी या फोनवर 12000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देत आहे. एवढेच नाही तर, ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. या टेक्नो फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आणि 1.32 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. याशिवाय हा फोन Mediatek D8050 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo