प्रीमियम फोन हवंय ? Samsung चा महागडा फोन थेट तुमच्या बजेट किमती खरेदी करा

Updated on 31-Mar-2023
HIGHLIGHTS

प्रीमियम फोन S20 मालिकेसोबत लाँच करण्यात आला होता.

Samsung Galaxy S20 FE 29,999 रुपयांना उपलब्ध आहे.

यासोबतच सॅमसंगने यावर काही सूटही ठेवली आहे.

Samsung Galaxy S20 FE 2020 मध्ये लाँच करण्यात आला, जो एक पावरफुल स्मार्टफोन आहे. डिव्हाइसला 6.5-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे आणि तो स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे उपकरण सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ते अतिशय वाजवी दरात खरेदी करू शकता. 

प्रीमियम फोन S20 सिरीजसोबत लॉन्च करण्यात आला होता आणि त्याची किंमत 74,999 रुपये होती. परंतु आता तो 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगने यावर काही अतिरिक्त सूटदेखील दिली आहे. 

Samsung Galaxy S20 FE वरील ऑफर्स

Samsung Galaxy S22 FE सॅमसंग ऑनलाइन स्टोअरवर 29,999 रुपयांना विकला जात आहे. परंतु तुम्ही या फोनवर अधिक बचत करू शकता. यासाठी तुम्हाला HDFC बँक कार्डने व्यवहार करावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

याशिवाय, यावर Paytm ऑफरदेखील समाविष्ट आहे. Samsung Galaxy S22 FE पेटीएम आणि पोस्टपेडने खरेदी केल्यास 1,500 रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळेल. 

Samsung Galaxy S20 FE चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S20 FE ला 6.5-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. Samsung Galaxy S20 FE स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटसह सुसज्ज आहे आणि तो 6GB आणि 8GB रॅमसह समर्थित आहे. फोन Android 10 वर चालतो परंतु Android 13 वर अपग्रेड केला जाऊ शकतो. 

Samsung Galaxy S20 FE मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप तुम्हाला मिळेल. ज्यामध्ये 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा टेलेफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रावाईड लेन्स मिळतो. सेल्फीसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 4500mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :