Oppo Reno8 5G वर आली जबरदस्त ऑफर, तब्बल 9000 रुपयांची बचत करण्याची संधी

Updated on 28-Mar-2023
HIGHLIGHTS

Oppo Reno8 5G वर प्रचंड सवलत

AMAZON वर मिळतेय ही अप्रतिम ऑफर

स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 9,509 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध

Oppo फोन प्रेमींसाठी Amazon ने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. जर तुम्हाला नवीन 5G फोन घ्यायचा असेल तर तुम्ही ही डील तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Oppo Reno8 5G स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 9,509 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. याशिवाय वापरकर्त्यांना अधिक बचत करण्याची संधी मिळेल.

किंमत आणि ऑफर्स :

Oppo च्या 5G फोनची MRP 38,999 रुपये आहे, पण तुम्हाला एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Oppo Reno 8 च्या खरेदीवर 24% सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही हा फोन फक्त 29,490 रुपयांना खरेदी करू शकता.

याशिवाय यूजर्सना एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळत आहे. तुमचा जुना फोन बदलून तुम्ही Oppo Reno 8 5G खरेदी करू शकता. असे केल्याने, तुम्हाला 18,750 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की, एक्सचेंजचा फायदा जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. येथून खरेदी करा  

Oppo Reno8 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno8 5G च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.43 इंच फुल HD डिस्प्ले सह येतो. यामध्ये यूजर्सना 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा फायदा मिळेल. या फोनला MediaTek Dimensity 1300 चिपसेटचा सपोर्ट मिळेल, जो याला मजबूत परफॉर्मन्स देण्यासाठी काम करतो.

फोटोग्राफीसाठी यात 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,500 mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. Oppo चा हँडसेट Android 12 OS वर चालतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :