Infinix चा सर्वात स्लिम लॅपटॉप लवकरच भारतात लाँच होणार, स्टायलिश डिझाईनसह दमदार बॅटरी

Infinix चा सर्वात स्लिम लॅपटॉप लवकरच भारतात लाँच होणार, स्टायलिश डिझाईनसह दमदार बॅटरी
HIGHLIGHTS

Infinix चा सर्वात स्लिम लॅपटॉप लवकरच भारतात होणार लाँच

लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 35,999 रुपये

लॅपटॉपच्या हाय मॉडेलची किंमत एकूण 55,999 रुपये

Infinix भारतात आपला InBook X1 स्लिम लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी, कंपनीने भारतात आपला Infinix InBook X1-Series लॅपटॉप सादर केले होते. आता, कंपनी भारतात InBook X1 Slim सादर करून आपल्या लॅपटॉप पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. InBook X1 Slim पुढील आठवड्यात भारतात येईल, याबाबत कंपनीने पुष्टी केली आहे. चला तर जाणून घेऊयात Infinix InBook X1 Slimबाबत सर्व महत्त्वाचा तपशील… 

Infinix InBook X1 स्लिम इंडिया लाँच डेट

 Infinix InBook X1 Slim भारतात 15 जूनपर्यंत लाँच होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. Infinix दावा करतो की, यात अनेक सेगमेंट-लिडिंग फीचर्स आहेत, याचाच अर्थ आपण कमी किमतीतही अनेक नवीन आणि छान फीचर्सची अपेक्षा करू शकतो. Infinix InBook X1 Slim हा 14.88 जाड आहे आणि त्याचे वजन 1.24kg आहे. हा Infinix च्या मते, त्याच्या प्राईस सेगमेंटमधील सर्वात हलका आणि स्लिम लॅपटॉप आहे. Infinix InBook X1 Slim मध्ये ऑल-मेटल बॉडी आहे. हा लॅपटॉप रेड, ग्रीन, ब्लु आणि ग्रे या चार नवीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. डिव्हाइसमध्ये मोठी बॅटरी आणि टाइप-C पोर्ट आहे.

हे सुद्धा वाचा: OnePlus कडून आकर्षक ऑफर! 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 5G स्मार्टफोन

Infinix InBook X1चे फीचर्स 

असा अंदाज लावला जात आहे की, Infinix Inbook X1 Slim मध्ये Infinix Inbook X2 प्रमाणेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  असतील. Infinix InBook X1 Slim हा देशातील InBook X2 चा रीब्रँडेड व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनी वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डिवाइसमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेणार आहे. InBook X1-Series लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 35,999 रुपये आणि हाय-एंड मॉडेलची किंमत 55,999 रुपये होती.

Infinix InBook X2चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix InBook X2 विंडो 11 होम वर काम करते. यामध्ये, 14-इंच फुल-HD (1,920×1,080 पिक्सेल) IPS डिस्प्ले,  300 nits ब्राइटनेस आणि 16:9 आस्पेक्ट रेशो आहे. हा लॅपटॉप Core i3-1005G1 प्रोसेसर, Intel Core i5-1035G1 आणि Intel Core i7-1065G7 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16 GB RAM आणि 512 GB M.2 SSD PCIe 3.0 स्टोरेज आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये InBook X2 स्पोर्ट्स ड्युअल-बँड Wi-Fi 802.11 ab/b/g/n/ac, ब्लूटूथ v5.1, दोन USB टाइप-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, एक HDMI 1.4 पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. यात DTS साउंड टेक्नोलॉजीसह स्टिरिओ स्पीकर आहेत. त्याबरोबरच, यात 50Wh ची बॅटरी आहे, जी संपूर्ण दिवस टिकते. या लॅपटॉपचे डायमेन्शन 323.3×211.1×14.8mm आणि वजन 1.24 kg आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo