भारीच की ! Infinix ने भारतात लाँच केला स्वस्त लॅपटॉप, किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी

भारीच की ! Infinix ने भारतात लाँच केला स्वस्त लॅपटॉप, किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Infinix ने भारतात लाँच केला Infinix InBook X1 Slim

लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 29,990 रुपये

Infinix InBook X1 Slim चे वजन 1.24 kg

Infinix ने भारतात आपला नवीन लॅपटॉप Infinix InBook X1 Slim लाँच केला आहे. ज्यांना लॅपटॉपसह प्रवास करायचा असतो, त्यांच्यासाठी Infinix InBook X1 Slim खास तयार करण्यात आला आहे. Infinix InBook X1 Slim चे वजन 1.24 kg आहे. हा लॅपटॉप तीन प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. ज्यात 10th Gen Intel Core i3, i5 आणि i7 समाविष्ट आहे. लॅपटॉपमध्ये, 16 GB पर्यंत RAM आणि 512 GB पर्यंत SSD स्टोरेज उपलब्ध असेल. चला तर जाणून घेऊयात लॅपटॉप्सबद्दल सविस्तर तपशील…. 

Infinix InBook X1 Slim ची किंमत

10the Gen Intel Core i7 प्रोसेसरसह Infinix InBook X1 Slim ची किंमत 49,990 रुपये आहे, Intel Core i5 ची 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत 44,990 रुपये आहे. त्याबरोबरच, Intel Core i3 ची 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत एकूण 29,990 रु. इतकी आहे. हा लॅपटॉप अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लू, नोबल रेड आणि स्टारफॉल ग्रे कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा : एका वर्षाच्या वैधतेसह OTT चा आनंद घ्या, बघा Airtel चा 'हा' जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Infinix InBook X1 Slim चे स्पेसिफिकेशन्स

Infinix InBook X1 Slim मध्ये 300 nits च्या ब्राइटनेससह 14-इंच लांबीचा फुल HD + IPS डिस्प्ले आहे. लॅपटॉपध्ये 16GB पर्यंत LPDDR4 RAM सह 512 GB पर्यंत M.2 NVMe PCIe 3.0 SSD स्टोरेज आहे. यात 50Wh बॅटरी आहे, जी 9 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करते, असा दावा केला जातो. यासह, यामध्ये 65W टाइप-C चार्जिंगचे समर्थन आहे, दावा आहे की बॅटरी 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

InBook X1 Slim मध्ये ऍल्युमिनियम अलॉय मेटल बॉडी मिळेल. लॅपटॉपसोबत HD वेबकॅम उपलब्ध असेल. यासह, स्टिरिओ स्पीकर देखील उपलब्ध असतील, ज्यात DTSचा सपोर्ट आहे. यात गेमिंगसाठी 1.0 कूलिंग सिस्टम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये दोन USB 3.0 पोर्ट, दोन USB Type-C पोर्ट, एक HDMI 1.4 पोर्ट, एक SD कार्ड रीडर आणि 3.5mm हेडफोन कॉम्बो जॅक देखील आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo