एका वर्षाच्या वैधतेसह OTT चा आनंद घ्या, बघा Airtel चा ‘हा’ जबरदस्त रिचार्ज प्लॅन

एका वर्षाच्या वैधतेसह OTT चा आनंद घ्या, बघा Airtel चा ‘हा’ जबरदस्त रिचार्ज प्लॅन
HIGHLIGHTS

Airtel चे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन

प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

वर्षभरासाठी मिळेल OTTचे मोबाईल सब्सक्रिप्शन

तुम्ही जर Airtel ची टेलिकॉम सेवा वापरत आहात, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या काही खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये पूर्ण 1 वर्षाची वैधता उपलब्ध आहे. एखादे प्लॅन रिचार्ज केल्यानंतर काही वेळाने यूजर्सचे रिचार्ज कालबाह्य होते. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा रिचार्ज करावा लागेल. त्यामुळे, अनेकदा ग्राहक नाराज होतात आणि त्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती हवी असते. आज आम्ही तुम्हाला Airtel च्या एका उत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 365 दिवसांची वैधता मिळेल. एवढेच नाही तर, हे प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर OTT चा आनंद देखील घेता येईल.  

Airtel चा 3,359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा : बजेट सेगमेंटमध्ये येणारे टॉप 5 TABLETS, दमदार बॅटरीसह मिळेल आकर्षक डिस्प्ले

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला इतरही अनेक सुविधा मिळतात. यामध्ये डिझनी + हॉटस्टारचे एका वर्षाचे मोबाइल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. याशिवाय विंक म्युझिक ऍपचे सबस्क्रिप्शनही या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

Airtel चा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtel चा 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एकूण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळतो.

Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला मेसेजिंगसाठी दररोज 100 SMS देखील मिळतात. यामध्ये, ऍमेझॉन प्राईम व्हीडिओचे एका वर्षाचे मोबाईल सब्स्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, तुम्हाला मोफत हेलोट्यूनसह विंक म्युझिकचा आनंदही घेता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo