HP ने आणला जगातील सर्वात बारीक लॅपटॉप HP Spectre 13

Updated on 07-Apr-2016
HIGHLIGHTS

ह्या लॅपटॉपची जाडी १०.४ mm आहे आणि ह्यात 13.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्लेसह 8GB रॅम, 512GB चे SSD स्टोरेज आणि इंटेल कोर i5/i7 प्रोसेसरमध्ये कोणत्याही एकाला निवडण्याचे पर्याय मिळेल.

HP ने बाजारात आपला नवीन लॅपटॉप Spectre 13 लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. ह्याची जाडी १०.४ mm आणि वजन २.४५ पाउंड्स (जवळपास १.१ किलोग्रॅम) आहे. हा अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबर बॉडीसह येतो. Spectre 13 मध्ये 13.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्या लॅपटॉपचे डिझाईन खूपच आकर्षक आहे. ह्यात हाय-एन्ड फर्निचर वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्याच्या किबोर्डमध्ये बॅकलिट किजसुद्धा आहेत. ह्यात एक ग्लास ट्रॅकपॅड आणि तीन USB टाइप-C पोर्ट्स दिले गेले आहेत. लॅपटॉपमध्ये 8GB ची रॅम आणि 512GB चे SSD स्टोरेज दिले गेले आहे आणि ह्यात इंटेल कोर i5/i7 प्रोसेसरमध्ये कोणत्याही एकाला निवडण्याचे पर्याय मिळेल.

हे देखील पाहा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी HP ने इंटेल हायपरबेरीक कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे. जी न केवळ गरम हवेला बाहेर काढते तर थंड हवा सुद्धा देते. HP Spectre 13 लॅपटॉप Bang & Olufsen ऑडियो टेक्नॉलॉजीसह येईल. ह्या डिवाइसची किंमत $1,169 (जवळपसा ७८,००० रुपये) आहे.

 

हेदेखील वाचा – ड्यूल कॅमे-याने सुसज्ज असलेला हुआवे P9, P9 प्लस स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा – २०१७ मध्ये सॅमसंग लाँच करणार फोल्ड होणारा स्मार्टफोन?

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :