Dell G15: Dell ने लाँच केला गेमिंग लॅपटॉप, उत्तम परफॉर्मन्ससह मिळतील आकर्षक फीचर्स

Dell G15: Dell ने लाँच केला गेमिंग लॅपटॉप, उत्तम परफॉर्मन्ससह मिळतील आकर्षक फीचर्स
HIGHLIGHTS

Dell ने लाँच केला Dell G15 गेमिंग लॅपटॉप

लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 83,990 रुपयांपासून सुरू

लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंत RAM उपलब्ध

Dell ने आपल्या G15 गेमिंग लॅपटॉपची AMD एडिशन भारतात सादर केली आहे. डिव्हाइस AMD Ryzen 7 6800H CPU आणि NVIDIA GeForce RTX 3060 GPU द्वारे समर्थित आहे. गेमिंग लॅपटॉप विभागात लेनोवो आणि ASUS सारख्या ब्रँडला मागे टाकण्याचे डेलचे लक्ष्य आहे. Dell G15 गेमिंग लॅपटॉपचे इंटेल व्हेरिएंट रिलीज केल्यानंतर, कंपनीने आता AMD हार्डवेअर चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी AMD CPU सह डिव्हाइस सादर केले आहे. कुलिंगसाठी यात एलियनवेअर-कमांड सेंटर डिझाइन देखील आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! 'या' 5 ब्रँडेड स्मार्टवॉच Amazon वर उत्तम ऑफर्ससह उपलब्ध, बघा यादी…

Dell G15 AMD एडिशनची किंमत

Dell G15 AMD एडिशनच्या बेस मॉडेलची किंमत रु.83,990 पासून सुरू होते. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलसाठी 1,27,990 रुपये ठेवली गेली आहे. 

DELL G15

Dell G15 AMD एडिशन

Dell G15 AMD एडिशनमध्ये बॅकलिट कीबोर्ड, मोठा ट्रॅकपॅड आणि टॉप-सेंटर्ड HD वेबकॅमसह गेमिंग-इन्स्पायर्ड डिझाइन आहे. टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी त्यात चार वेंट आहेत. लॅपटॉपमध्ये 15.6-इंच फुल-HD  (1080×1920 पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत आणि 250-nits ची पीक ब्राइटनेस आहे. हे डार्क शॅडो ग्रे आणि फँटम ग्रे कलरमध्ये सादर करण्यात आले आहे.

DELL G15

Dell G15 AMD एडिशनमध्ये AMD Ryzen 7 6800H प्रोसेसर आणि 6 GB पर्यंत NVIDIA GeForce RTX 3060 GPU आहे. हे उपकरण Windows 11 OS वर चालते. हे 16GB पर्यंत रॅम आणि 512GB SSD स्टोरेजसह सादर केले गेले आहे. I/O साठी, यात तीन Type-A पोर्ट, एक Type-C पोर्ट, HDMI 2.1 स्लॉट आणि 3.5mm ऑडिओ जॅक समाविष्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo