#image_title
Amazon Great Summer Sale 2025: प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Amazon च्या मेगा समर सेलची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही आकर्षक विक्री पुढील महिन्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये प्राइम सदस्यांना नेहमीप्रमाणे अर्ली ऍक्सेस मिळणार आहे. सेल दरम्यान, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर उत्तम डील दिल्या जातील. याव्यतिरिक्त, तुम्हाला वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरवरही उत्तम डील मिळतील. पहा सर्व डील्स-
Amazon India च्या मते, Amazon Great Summer Sale 2025 सामान्य ग्राहकांसाठी 1 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाईव्ह होईल. परंतु, प्राइम सदस्यांना 12 तास आधी म्हणजेच मध्यरात्री 12 वाजल्यापासून सेलचा लाभ घेता येईल. आता जर आपण सेलमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सवर नजर टाकली तर, HDFC बँकेच्या वापरकर्त्यांना क्रेडिट कार्डने काहीही खरेदी केल्यास 10% सूट मिळेल. तर, ICICI बँकेच्या वापरकर्त्यांना खरेदीवर 5% कॅशबॅक दिला जाईल.
या जबरदस्त सेलमध्ये लेटेस्ट महागडे स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह मिळतील. होय, लेटेस्ट iPhone 16, Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy M35 5G आणि Galaxy A55 5G सारखे स्मार्टफोन सवलतीच्या दरात मिळणार आहे. यासोबतच, इतर प्रसिद्ध ब्रँड्स Xiaomi, Vivo, Oppo आणि Realme चे स्मार्टफोन देखील कमी किमतीत खरेदी करता येतील.
Amazon India च्या समर सेल दरम्यान स्पिन अँड विन कार्यक्रम आयोजित केला जाईल. ज्यामध्ये ग्राहकांना नवीनतम iPhone 16 Pro जिंकण्याची संधी मिळेल. याशिवाय, गेम्सचेही आयोजन केले जाईल. यासह, ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकता येतील.
प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Amazon India ने अद्याप सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असे मानले जात आहे की, Lenovo, Asus आणि HP सारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर उत्तम डील दिले जातील, ज्यामुळे त्यांच्या किमती घसरणार आहेत. एवढेच नाही तर, स्मार्ट टीव्हीवर आश्चर्यकारक ऑफर दिल्या जातील. या सेल दरम्यान Amazon TWS इअरबड्स, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीजच्या किमतीही कमी करणार आहे. आकर्षक एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI प्लॅनमुळे हे डील ग्राहकांसाठी आणखी चांगले आणि परवडणारे बनतील.